Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
उत्तर
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हरवलं!
मराठी साहित्यक्षेत्रातील लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असेही म्हटले जात होते. तसेच त्यांना त्यांचे चाहते त्यांच्या आद्याक्षावरून ‘पुलं’, ‘भाई’ असेही म्हणत असत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दुःखद निधन १२ जून २००० रोजी झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्रातील सम्राट आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हरवलं.
त्यांचा जन्म मुंबई येथे ८ नोव्हेंबर, १९१९ मध्ये झाला असून त्यांनी नाटककार, साहित्यकार, संगीतकार, विनोदीलेखक, तत्वज्ञ, दूरचित्रवाणीसाठी लेखन, संगीतकार व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. गुळाचा गणपती या सबकुछ ‘पुलं’ म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. या व्यतिरिक्त त्यांच्या कार्यक्षेत्राची दखल घेत असता नाते आदर्श शिक्षक, नट, नवलाकार, गायक, कवी, पेटीवादक, वक्ते म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी, ऑल इंडिया रेडिओ अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याची चमक दाखवत मनसोक्त विहार केला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या या लेखकाचे मराठी भाषेवरही विलक्षण प्रभुत्व होते त्यांच्या भाषाप्रभु्ताचेही अनेक किस्से लोकप्रिय आहेत. त्यांच्यावर मराठी भाषेत ‘भाई’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला असून या चित्रपटाचे दोन भाग आहेत.
त्यांनी दूरदर्शनच्या सर्वप्रथम प्रसारणासाठी पंडित नेहरूंची मुलाखत घेतल्याने ते भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार म्हणुन प्रसिद्ध झाले. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोन्हींचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होता. पुलंनी मुंबईतील नॅशनल सेंता फॉर परफॉर्मिंग आर्टस या संस्थेत अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिमिती, मुलाखती, लेख असे साहित्य पुलंनी जमा करून ठेवले आहे. याव्यतिरिक्त पुलंनी NCPA च्या रंगमंचावर देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकीसारखे अलौकिक असे कार्यक्रम सादर केले. पुलं भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली व कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत असतं, असेहे पुलं त्यांनी जवळजवळ ४० वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली अशा वैविध्यपूर्ण लेखनामुळे पुलं लोकप्रियतेच्या उच्चशिखरावर जावून पोहोचलेतशी खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक अशी पुस्तके प्रचंड गाजली. याशिवाय त्यांची व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली. एकूणच त्यांची साहित्यकृती म्हणजे ‘किती घेशील दोकराने’ अशी होती. त्यामुळेच त्यांना पद्मश्री सन्मान, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारांनी ने सन्मानीत झाले. त्याचबरोबर त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या या योगदानाची नोंद मराठी साहित्याच्या अभ्यासकांना त्यांच्या चाहत्यांना, वाचकांना नक्कीच घ्यावी लागेल.