मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

पाणी हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी आपले बाह्यांग स्वच्छ करते, योगीपुरुषाच्या सहवासाने मात्र आपण अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ होतो. आपला सबाह्य विकास घडतो.

पाणी तहानलेल्याची तहान भागवते, त्याच्या जिभेला सुखवते, तर योगीपुरुष लोकांना आत्मानंद, स्वानंद मिळवून देतो. चिरकाल टिकणार्या, कधीही न संपणाऱ्या या आनंदाचा अनुभव योगीपुरुष सामान्य जीवांना मिळवून देतो.

पाणी पावसाच्या रूपाने आकाशातील ढगांतून खाली येते. त्यामुळे, शेते पिकवून पृथ्वीवरील जीवांना अन्नधान्य मिळते. त्याचप्रमाणे योगीपुरुष या इहलोकात जन्म घेऊन येथील लोकांचा उद्धार करतो.
अशाप्रकारे, पाणी व योगीपुरुष आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जगाचे कल्याण करतात, इतरांच्या उपयोगी पडतात. त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्यालाच वाहिलेले असते.

shaalaa.com
योगी सर्वकाळ सुखदाता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - (आ) योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना - कृती [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - (आ) योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना
कृती | Q (५)(इ) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्य पूर्ण करा.

अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______.  


खालील वाक्य पूर्ण करा.

पिलांना सुरक्षितता देणार - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

स्वत:ला मिळणारा आनंद - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

व्यक्तीला सदैव सुख देणारा - _______.


खालील तक्ता पूर्ण करा.

योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योगीपुरुष जीवन (पाणी)
   

खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी॥


‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.      8

1. चौकटी पूर्ण करा.     2

अ) चंद्रकिरण पिऊन जगणारा - ______ 

ब) पिल्लांना सहारा - ______ 

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।

2. आकृती पूर्ण करा.      2

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा.   2

  1. उदक - 
  2. मळ -
  3. रसना -
  4. निजज्ञान -

4. काव्यसाैंदर्य

योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.   2


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - जन निववी श्रवणकीर्तनें ।
निजज्ञानें उद्‌धरी ।।
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - (i) उदक -
(ii) मधुर - 
(iii) तृषित -
(iv) क्षाळणे -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  2. चिरकाल टिकणारा आनंद - ______

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. उदक -
  2. स्वानंदतृप्ती - 
  3. मृदुत्व - 
  4. इहलोकीं - 

४. काव्यसौंदर्य: (2)

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या वाक्याचे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×