Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
![]() |
आदर्श विद्यालय रवीनगर, गडचिरोली ‘विज्ञानदिन सोहळा’ विज्ञानदिनानिमित्त |
![]() |
वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख सिटी कॉलेज, गडचिरोली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. |
विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.
Solution
गडचिरोली: २ मार्च (वार्ताहर) रवीनगर येथील आदर्श विद्यालयामध्ये २८ फेब्रुवारी रोजी विज्ञानदिनानिमित्त वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सिटी कॉलेजचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्री. विजय आफळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले.
विज्ञानातील प्रगती पाहून सर्वांना समाधान वाटले. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आणि संशोधनात्मक विचारांना चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हे प्रदर्शन खूप उपयोगी पडेल. तेव्हा असा हा प्रदर्शनाचा उपक्रम विविध ठिकाणी सतत चालू राहिला पाहिजे असे विचार उद्घाटक श्री. आफळे यांनी मांडले.