Advertisements
Advertisements
Question
आपल्या परिसरात असलेल्या 'पाणी अडवा, पाणी जिरवा' प्रकल्पास भेट द्या. माहिती मिळवा व नोंद करा.
Activity
Solution
प्रकल्पाचे नाव: पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प
प्रकल्पाचे ठिकाण: कामर गाव, सातिवली
भेटीचा उद्देश: पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती मिळवणे व त्याचे महत्त्व समजून घेणे.
वैशिष्ट्ये:
- पाण्याचे साठवणूक साधने:
- सिमेंटचे बांधलेले बंधारे
- मातीने बनवलेले छोटे बंधारे
- खड्डे व पाणथळ भाग
- पाणी अडवण्याची साधने:
- ओढ्यांवर बंधारे घालणे
- खाचरं, चर खोदणे
- पाण्याचा झरा थांबवणारे बंध
- पाणी जिरवण्याची साधने:
- साठलेल्या पाण्याचा जमिनीत झिरपून भूगर्भात जाण्याचा मार्ग
- वृक्षारोपण व गवत लावून मातीचा धूप रोखणे
प्रकल्पाचे फायदे:
- भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली.
- शेतात पाणी अधिक दिवस टिकते.
- पाण्याची उपलब्धता वर्षभर सुधारली.
- पिकांची उत्पादकता वाढली.
- गावकऱ्यांना शेतीसाठी पूरक फायदा झाला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान शाश्वत जलव्यवस्थेसाठी खूप उपयुक्त आहे. असे प्रकल्प प्रत्येक गावात राबवले गेले पाहिजेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?