Advertisements
Advertisements
Question
आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
Answer in Brief
Solution
आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी विचारात घ्याव्या लागतील त्या पुढीलप्रमाणे:
- आपत्तीपूर्वीचा काळ: हा काळ आपत्तीच्या आधीचा असतो, जेव्हा आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त/प्रवण भूभागांची ओळख करून घेतली जाते, आपत्तीची तीव्रता आणि संभाव्य ठिकाणाची माहिती करून घेतली जाते, आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेतले जाते.
- इशारा काळ: हा काळ त्या क्षणापासून सुरू होतो जेव्हा आपत्तीच्या निकट आगमनाची चाहूल लागते आणि ते जवळ येईपर्यंतचा काळ असतो. या टप्प्यात लोकांना सूचना देणे, तयारी वाढवणे आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे समाविष्ट असते.
- आणीबाणीचा काळ: ह्या काळात वेगवेगळ्या हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. त्यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे या व इतर अनेक कृती अपेक्षित असतात.
- संक्रमणावस्था: या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. जसे ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती इत्यादी. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल. आपद्ग्रस्ताचे पुनर्वसन कार्य हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यावरील मानसिक आघात ओसरण्यास कमीत कमी काळ लागतो व त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकते.
shaalaa.com
आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती (Nature and scope of disaster)
Is there an error in this question or solution?