English

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस. -

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.

Answer in Brief

Solution

मेहनती शेतकरी

रामपूर गावात आटपाट नावाचं नगर होतं. तेथे गोविंद नावाचा शेतकरी राहत होता. गोविंद अत्यंत साधा, भोळा आणि मेहनती होता. तो आंब्याच्या बागेत काम करत असे. बागेमध्ये भरपूर झाडे होती. गोविंद आता वृद्ध झाला, तरी तो बागेत काम करीत होता. एके दिवसी त्या नगराचा राजा हरिश्चंद्र फेरफटका मारत-मारत गोविंदच्या बागेत आला. पाहतो तर वृद्ध गोविंद आंब्याची नवीन रोपे लावत होता.

राजाला गोविंदचे नवीन रोप लावण्याचे आश्चर्य वाटले. म्हणून तो त्याला म्हणाला की, “तुम्ही आंब्याचे नवीन रोप का लावत आहे? या झाडांची फळे तुम्हाला खायला कशी मिळणार?” यावर गोविंदने स्मितहास्य केले आणि म्हणाला आज मी ज्या झाडांची आंबे खातो ती झाडे मी लावली नाहीत अर्थात जर माझ्या आई-वडिलांनी ती झाडे लावली नसती तर आज मी या फळांचा आस्वाद घेऊ शकलो नसतो. आणि जे त्यांनी केले तेच मी देखील माझ्या भावी पिढीकरिता करत आहे. गोविंदचे हे उत्तर व विचार ऐकून राजा फार खुश झाला आणि त्याने आपल्या गळयातील हार त्याला बक्षीस म्हणून दिला व तिथून निघून गेला.

तात्पर्य - फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा.

shaalaa.com
कथालेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×