Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
Solution
'सुंदर मी होणार' या पु. ल. देशपांडेलिखित नाटकातील प्रस्तुत नाट्यउताऱ्यामध्ये दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी 'सुंदर होणे' या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे.
'सुंदर' हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्त्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या मनाच्या प्रगल्भ वैचारिक पातळी वर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यांतील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्त्व तत्त्वनिष्ठ ठरते. मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक हवी, असे सर्वांगसंपन्न व्यक्तिमत्त्व होणे म्हणजे आपण 'सुंदर' होणे आहे. अशा प्रकारे जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे, हा 'सुंदर' शब्दाचा अर्थ आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
↓ |
_____________ |
↓ |
____________ |
↓ |
पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
↓ |
____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
पात | प्रतिक्रिया |
राजेंद्र | |
बेबी |
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मुलांचे चिमणे विश्व
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.