Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
Solution
पावसानंतर माझ्या परिसरातील सृष्टीचे रूप बदलना जाते. कडक उन्हात रखरखीत झालेल्या जमिनीवर हिरवळीची शाल अंथरली आहे, असा भास होतो. बोडके डोंगर गवत तुऱ्यांनी नटतात. त्यांतून धबधब्याची पाझर दुधाच्या पाण्यासारखे खाली झेप घेतात. नदी, नाले, ओढे खळखळ वाहत गाणे म्हणत हुंदडतात. पेरणी व लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे थुई थुई उडू लागते. झाडे अंघोळ केल्यासारखी स्वच्छ व तजेलदार होतात. गुरेढोरे आनंदाने बागडत पोटभर चारा खातात. पोरेटोरे उल्हासाने पाण्यामध्ये उड्या मारत, खेळतात, घरेदारे ताजी टवटवीत होऊन आनंदाचा हुंकार देतात. पाखरे मुक्तपणे आकाशात भरारी घेतात व मजेत विहार करतात. पावसानंतर सर्व चराचराचा कायापालट होतो. माणसांची, पशु पक्ष्यांची तहान शमते. माझ्या गावाचे आनंदवनभुवन होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________
चौकटी पूर्ण करा.
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा - _________
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.
चौकटी पूर्ण करा.
शेतात रमणारी व्यक्ती - _________.
कारण लिहा.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........
कारण लिहा.
बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग
खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.
प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी | प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी | प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी | मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी |
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.