Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती.
‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
Solution
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी 'समुद्र अथांग आहे, असीम आहे.' अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सागरा प्राण तळमळला' अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती. कुसुमाग्रज यांनी तर 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत "हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला/ अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" असे आव्हान दिले, तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही, याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा! पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट, मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो.
पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला; पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला.
पंचमहाभूतांपैकी मी एक 'भूत' तुम्हांला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत, तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल!
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण...
कारणे लिहा.
समुद्र अस्वस्थ होतो, कारण...
कारणे लिहा.
समुद्र शिणून जातो, कारण...
तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | मनाला भिडणारे शब्दसमूह |
चौकटी पूर्ण करा.
खालील ओळींचा अर्थ लिहा.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
काव्यसौंदर्य.
‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
काव्यसौंदर्य.
'समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.'
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
रसग्रहण.
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
अभिव्यक्ती.
शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. |
वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरांतील. |
(१) कारणे लिहा.
(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण ______
(र) समुद्र शिणून जातो, कारण ______
(२) चौकटी पूर्ण करा.
(३) अभिव्यक्ती:
शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा.