Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती.
व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
Solution
आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो, ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही. त्याचे कष्ट जाणवत नाहीत. उलट, ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय.
आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल, तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. तशी ती कळली, तर आपल्याला आत्मविश्वास येईल. म्हणजेच, आनंदी, सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो. कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोदयोग. दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो.
आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत, हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो, हीच बुद्धिमत्ता होय.
थोडक्यात, आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो, हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे.