Advertisements
Advertisements
Questions
अमेरिकेने ______ या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
अमेरिकेने जपानच्या ______ या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
Options
नागासाकी
हिरोशिमा
पर्ल हार्बर
स्टॅलिनग्राड
Solution
अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
स्पष्टीकरण:
जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती. १९४१ मध्ये जपानने पर्लहार्बरवर बॉम्बहल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने या युद्धाला व्यापक स्वरूप आले. पुढे फिलीपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकले. तसेच आसाम, आराकान, इंफाळ या भागापर्यंत जपानने धडक मारली. तेव्हा इंग्लंडने जपानचा प्रतिकार केला. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलीपाईन्स परत घेतले. जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. अखेरीस १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपान शरण आला आणि हे दुसरे महायुद्ध संपले.