Advertisements
Advertisements
Question
अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
अर्थ:
- संचालक मंडळाने दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेल्या लाभांशास अंतरिम लाभांश म्हणतात.
- जर लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश देता येतो. त्यासाठी कंपनीच्या लेखा अंकेक्षकाचे मत घेतले पाहिजे.
- कंपनीच्या नियमावलीने दिलेल्या अधिकारानुसार संचालक मंडळ मध्यावधी लाभांश घोषित करते.
वैशिष्ट्ये:
- अंतरिम लाभांश जाहीर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला असतात.
- अंतरिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल.
- अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने वर्षातील काही महिन्यांच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षांसाठी घसाऱ्याची तरतूद केली पाहिजे.
- कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही.
- कंपनीच्या नियमावलीने अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे.
- संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो.
- अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर ५ दिवसांच्या आत घोषित केलेल्या लाभांशाची रक्कम शेड्युल्ड बँकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करणे आवश्यक आहे.
- अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून ३० दिवसांच्या आत वाटप करणे आवश्यक आहे.
- न दिलेला किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश ‘लाभांश देणे खाते’ या खात्यात लाभांश वाटपाची मुदत संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत म्हणजे घोषणेपासून ३० दिवसांनंतर किंवा घोषणा झाल्यानंतर ३७ दिवसांच्या आत वर्ग करावी लागते.
- लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांश रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून ७ वर्षाच्या आत न दिल्यास कंपनीस सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी खाते आयईपीएफ (Investor’s Education and Protection Fund - IEPF) मध्ये वर्ग करावी लागते.
shaalaa.com
अंतरिम लाभांश
Is there an error in this question or solution?