English

अर्थ स्पष्ट करा. माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके । - Marathi

Advertisements
Advertisements

Question

अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।

Short Note

Solution

संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेवर असलेले प्रेम आणि अभिमान व्यक्त केले होते. ते म्हणतात की मराठी भाषेतील शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुर्य आहे, जे अमृताच्या माधुर्याशीही स्पर्धा करू शकते.

माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल. कारण अमृता पेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे. 

ज्ञानेश्वर महाराजांचे मते, त्यांच्या मराठी भाषेतील अक्षरांमध्ये असा गोडवा असेल की जे अमृतालाही आपल्या कमीपणाची जाणीव करून देईल. त्यांच्या मते, हे अक्षर एवढे माधुर्यपूर्ण आणि जीवनदायी असतील की श्रोते त्यांचा आस्वाद घेताना कधीही माधुर्याची कमतरता अनुभवणार नाहीत.

shaalaa.com
पद्य (Poetry) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके - कृती [Page 34]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
Chapter 2.08 ऐसीं अक्षरें रसिके
कृती | Q (२) (अ) | Page 34

RELATED QUESTIONS

अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।


चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______


चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम  _______


चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा  _______


खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥


कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’


सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड  करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.


‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.


आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.


'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.


‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-


खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.


‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा


‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.


स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×