Advertisements
Advertisements
Question
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) दिलेल्था उताऱ्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(i)
(ii)
- आईचं नातं
- इतर नाती
अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रं ही नि:शब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते’. हे मी स्वत: अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचताे म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं. व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत ‘बाबा’. पाऊस ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाही येत; पण तरीदेखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाचा पंचाहत्तरी पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्यामागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आलं आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो. |
(२) व्यंग हे भाषेपेक्षा संवादाचे माध्यम आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. (2)
(३) स्वमत अभिव्यक्ती- (4)
लेखकाने व्यंगचित्रातून वडिलांना कशाप्रकारे श्रद्धांजली वाहिली? हे स्पष्ट करा.
किंवा
व्यंगचित्राकार म्हणून ‘आई’ विषयी मांडलेली काव्यात्म कल्पना तुमच्या भाषेत लिहा.
Solution
(१) (i)
(ii)
-
हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे.
-
हि जोडलेली असतात.
(२) कमीतकमी रेषा, कमीतकमी तपशील आणि जास्तीत जास्त आशयाने युक्त अशी कलाकृती म्हणजे व्यंगचित्र असून ती चित्रकाराची एक सर्जननिर्मिती असते. अशाप्रकारचे चित्र काढत असताना लेखकाच्या लक्षात येते की व्यंगचित्र हे नि:शब्द भाषा असून त्या रेषांना शब्द नाहीत तरीही ती एक प्रभावी भाषा आहे कारण रेषानिर्मित व्यंगचित्रामध्ये भाषेचा वापर कुठेही नकरता कल्पकतेचा वापर करून तयार केलेल्या चित्रांतून कल्पक आशय निदर्शनास येतो. रेषांना शब्द नसले तरी चित्रकाराला जो आशय रसिकांपर्यंत पोहोचवायवा आहे तो पोहोचतो म्हणेजच व्यंगचित्र हे भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात येते त्यामुळेच हे माध्यम जास्तीत जास्त सामाजिक वा राजकीय विषय वा त्यातील डावपेच जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरते. जनजागृतीसाठीही अशा चित्रांचा वापर प्रभावीपणे केला जातो.
(३) सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर लिखित ‘रंगरेषा व्यंगरेषा’ या पुस्तकातून घेतला असून या पाठात लेखकाने एक व्यंगचित्रकार या नात्याने आपल्या वडिलांना व्यंगचित्राच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली अतुलनीय व तितकेच मामिर्क आहे.
व्यंगचित्रकार म्हणून प्रवास करत असताना अनुभव, त्यांना मिळत गेलेले औपचारिक शिक्षण व त्यातून झालेल्या त्यांचा विकास तसेच व्यंगचित्राची मिळालेली नैसर्गिक देणगी या सर्वांतून एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या वडिलांनाच व्यंगचित्रातून मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे. ते पुढीलप्रमाणे-
व्यंगचित्रातील पहिल्या चित्रात लेखक भर पावसात उभा असून डोक्यावर दोन अक्षरे आहेत ‘बाबा’. इथे बाबा या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पाऊस जोरात पडतो आहे मात्र या ‘बाबा’ शब्दाखाली असलेला छोटा सा जीव सुरक्षित आहे. हे लेखकाचे चित्रकार म्हणून असलेले बालपण आणि त्यांना त्यांच्या वडिलांमुळे मिळणारी सुरक्षितता अधिक मार्मिम वाटते. आणि दुसऱ्या चित्रात लेखक उभे आहेत ते पंच्याहत्तर वर्षांचे परंतु या चित्रात लेखकाच्या डोक्यावर ‘बाबा’ ही अक्षरे नाहीत मात्र वरून पडणारा पाऊस लेखकाच्या दोन्ही बाजूंनी जातो आहे याचाच अर्थ असा की लेखकाच्या बाबांनी त्यांच्यासाठी जे काही केले आहे, जो काही आश्रय दिला, आधार दिला तो या चित्रातून व्यक्त होताना दिसतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक मुलाच्या मुलांसाठी खूप काही करत असतात. मुलांसाठी वडिलांचा खूप मोठा आधार असतो. हे येथे या चित्रातूनही लक्षात येते. त्यामुळे मुलेसुद्धा आपल्या वडिलांच्या छत्रछायेखाली सुरक्षित व समाधानी असतात. अशाप्रकारे लेखकाने चित्रकार या नात्याने आपल्या वडिलांना पहिल्यांदाच श्रद्धांजली वाहिली आहे.
किंवा
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर लिखित ‘रंगरेषा व्यंगरेषा’ हा आत्मचरित्रात्मक पाठ असून या पाठात व्यंगचित्र ही निःशब्द भाषा असून शब्दांपेक्षाही अत्यंत मार्मिक असते आणि तो परिणामकारकरित्या काव्यात्म अभिव्यक्ती कशी साधू शकते हे आईंच्या चित्राच्या उदाहरणांतून त्यांनी दाखवून दिले आहे.
व्यंगचित्र हे निःशब्द आणि प्रभावी भाषा असून तो भाषे इतकीच संवादी, काव्यात्म कल्पना व्यक्त करणारे आहे. यासाठी लेखकाने एक काव्यात्म कल्पना चित्र रेखाटले ते आईविषयी भावना व्यक्त करणारे आहे. चित्रामध्ये उन्हाळ्यातला वैशाख वणवा असून त्यातच एक सुकलेले झाड निष्पर्ण असे उभे असून त्या झाडाच्या फांदीवर पक्षी बांधलेले घरटे असून त्या घरट्यात आपली चोच उघडून आकाशाकडे पाहणारी पक्ष्यांची पिलं आहेत. तर त्या पिलाची आई कणसदृश्य वर आकाशात गेली असून दूरवर तिला एक पावसाचा ढग सापडलेला असतो. तो ढग ती आपल्या चोचीने घरट्याच्या दिशेने आणत आहे. हे त्या घरट्यातील पिले आणि त्यांची आई यातील नाते हे समस्त मायलेकराचे प्रतिनिधित्व करताना दिसते. शब्दांतून व्यक्त करता येणारे शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त केलेले नाते अधिक हदयस्पर्शी झाल्याने हे चित्रांतून व्यक्त केला तो त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची पावती त्याच्यांच व्यंगचित्र चाहत्यांकडून त्यांना मिळाली. अशाप्रकारे व्यंगचित्रकार म्हणून आईविषयीची काव्यात्मक कल्पना लेखकाने आपल्या व्यंगचित्रातून मांडली आहे.