Advertisements
Advertisements
Question
औद्योगिक क्रांती इंग्लंड मध्ये सुरू झाली कारण ______.
Options
इंग्लंड हा मोठा देश होता.
इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता.
इंग्लंडमध्ये मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती.
औद्योगिक क्रांती मर्यादित स्वरूपाची होती.
Solution
औदयोगिक क्रांती इंग्लंड मध्ये सुरू झाली कारण इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता.
स्पष्टीकरण:
इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा माेठा प्रदेश होता. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले. नाविक सामर्थ्याच्या जोरावर हा कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला. मिळणाऱ्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. याच्याच जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे शक्य झाले. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली.