Advertisements
Advertisements
Question
भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.
Answer in Brief
Solution
- भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वांत महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते.
- तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणिअमेरिका यांच्या तील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले.
- भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला.
shaalaa.com
भारत आणि इतर देश
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील तक्ता पूर्ण करा.
क्र | झालेले करार/देवाणघेवाण | संबंधित देश |
१. | ____________ | भारत-पाकिस्तान |
२. | मॅकमोहन रेषा | ______ |
३. | ____________ | भारत-बांगलादेश |
४. | नैसर्गिक वायूची आयात | ______ |
५. | ____________ | भारत-अमेरिका |
६. | पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य | ______ |
७. | ____________ | भारत-आफ्रिका |
शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा.
दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे?
राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या परराष्ट्र दौऱ्यांची माहिती मिळवा.
विविध देशांच्या ‘युथ एक्सचेंज’ कार्यक्रमाची माहिती मिळवा.