Advertisements
Advertisements
Question
भारत-चीन संबंधांवर थोडक्यात चर्चा करा.
Solution
(१) १९४९ साली साम्यवादी क्रांतीनंतर चीनला भारताने राजनयिक मान्यता दिली. प्रारंभीच्या काळात या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. १९५४ मध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्व मान्यता दिली.
(२) त्यानंतरच्या काळात सीमावादावरून १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यांनी राजनयिक संबंध तोडले.
(३) १९७६ मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. सीमा विवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौदाहपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला.
(४) १९९० च्या दशकात चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला.
गेल्या दोन दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताच्या सर्वांत मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे.
(५) चीनच्या महत्त्वाकांक्षी "बेल्ट अँड रोड" प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल वाटाघाटीत ते एकमेकांचे भागीदार आहेत.
(६) चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा हीदेखील भारतासाठी एक समस्याच आहे,