English

भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.

Answer in Brief

Solution

प्रस्तावना: खेळासाठी साहित्याची गरज असते. भारतात प्राचीन काळापासून खेळणी बनवली जात असत.

१. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये दगड, माती, हाडे आणि शिंगे यांच्यापासून तयार केलेली खेळणी सापडली आहेत. मळलेल्या मातीपासून हाताने किंवा साच्याने ही खेळणी तयार करत असत.

२. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आला आहे.

३. 'कथासरित्सागर' या प्राचीन ग्रंथातही मनोरंजक खेळ व खेळणी यांचे वर्णन आले आहे. यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन असून कळ दाबताच या बाहुल्या उंच उडत, काही नाचत, तर काही आवाज करत असत असा उल्लेख आहे.

४. शुद्रकाच्या एका नाटकाचे नाव 'मृच्छकटीक' असे असून याचा अर्थ मातीची गाडी असा होतो.

५. भारतातील अनेक भागांत अशा लाकडी बाहुल्या बनवल्या जात असून महाराष्ट्रातील या बाहुल्या रंगीत असत व त्यांना ठकी म्हटले जात असे.

६. इटलीमधील पाँपेई शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असून यांद्वारे इतिहासकारांनी भारत व रोम यांच्यातील परस्परसंबंधांविषयक अनुमान केले आहे. उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरूनही प्राचीन काळच्या देशांच्या संबंधांबाबत माहिती मिळते, हे यावरून दिसून येते.

निष्कर्ष: अशारीतीने, प्राचीन साहित्य आणि उत्खननात सापडलेली खेळणी यांद्वारे आपल्याला खेळाच्या साहित्याचा किंबहुना खेळाचा इतिहास जाणून घेता येतो. 

shaalaa.com
खेळ आणि इतिहास (परिचय)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.7: खेळ आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.7 खेळ आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १.

RELATED QUESTIONS

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.


खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.


२९ ऑगस्ट हा ______ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो. 


इटलीतील ______ शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जिवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे.

१. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचक कोण होते?

२. बाळ ज. पंडित यांना कशाचे उत्तम ज्ञान होते?

३. बाळ ज. पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये लिहा. 


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
  1. प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे?
  2. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?
  3. ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×