Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
Solution
- ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
RELATED QUESTIONS
खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.
ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.
खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.
ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.
ॲमेझॉनस, रिओ दी जनेरिओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.
सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग ब्रझीलने व्यापला आहे?
टिपा लिहा.
ब्राझील लोकसंख्या घनता
ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील ______ लोकसंख्या असलेला देश आहे.