Advertisements
Advertisements
Question
भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव.
Solution
जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो. त्यांपैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो. सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे पर्वत, पठार, मैदान, वाळवंटे आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात. यांपैकी किनारपट्टीची आणि नदीची मतदान ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात. पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा, सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता, शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते. त्यामुळेच जगातील बहुतांशी जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एक तर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी-खोऱ्यांमध्ये आढळतात.
या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते. ग्रीनलँड, कॅनडाच्या उत्तरेकडचा प्रदेश रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश, कलहारी, सहारा, ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट या वाळवंटी प्रदेशांत लोकसंख्या फारच कमी आढळते.
अशाप्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव पडतो.