Advertisements
Advertisements
Question
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा.
Solution
(१) छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला.
(२) परकीयांचे छुपे हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकार केला.
(३) नौदल उभारले, जलदुर्ग बांधले, परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले.
(४) इंग्रजांचा स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवून स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिले.
(५) परकीय सत्तेला स्वराज्यात व्यापार करण्याचा परवाना दिला; तरी त्यावर अडीच टक्के जकात बसवली.
(६) राज्याभिषेकासाठी आलेल्या हेन्री ऑक्झिंडेन याने शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु;
(७) इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत, अशी भूमिका घेतली.
(८) याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा, ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली.
(९) जंजिऱ्याच्या सिद्दीशी तह करावा व त्याची जहाजे बुडवू नयेत, ही अटही शिवरायांनी अमान्य केली.
(१०) स्वराज्याच्या धोरणात, कारभारात अन्य कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीही सहन केला नाही. मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे त्यांचे धोरण यातून दिसून येते.