English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

चित्र पाहा. संवाद वाचा. नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

चित्र पाहा. संवाद वाचा.

नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही.
आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे.
नीता : जलपर्णी म्हणजे काय गं आजी?
आजी : पाण्यात उगवणारी वनस्पती.
नीता : ती पाण्यात का उगवते?
आजी : पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते.
नीता : आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना!
आजी : हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदुषणाची निदशर्क आहे.
नीता : अरेरे! आजी, आता याजलपर्णीचं काय करायचं?
आजी : पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची.

नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?

Short Answer

Solution

नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून निर्माल्य, मूर्ती, कचरा, प्लास्टिक इत्यादी नदीत टाकू नये. कारखान्यांना रासायनिक घटक असलेले पाणी नदीत टाकण्यापासून अटकाव केला पाहिजे. सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून, त्याचा झाडांस़ाठी वापर करता येईल. यामुळे, जलप्रदूषणही होणार नाही. अशाप्रकारे, नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून उपाययोजना करता येतील.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.2: आपली समस्या आपले उपाय - १ - विचार करा. सांगा. [Page 26]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q ३ | Page 26
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.5 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q ३ | Page 45
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.5 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q २ | Page 45
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×