Advertisements
Advertisements
Question
चळवळ म्हणजे काय?
Solution
१. चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो. लोकांच्या विशिष्ट सार्वजनिक प्रश्नांभोवती निर्माण झालेल्या संघटनेतून चळवळ उभी राहते. उदा. प्रदूषण या एका प्रश्नाबाबत चळवळ उभी राहू शकते.
२. चळवळीसमोर निश्चित सार्वजनिक हेतू किंवा प्रश्न असतो. उदा; भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो.
३. प्रत्येक चळवळीला नेतृत्व असावे लागते. खंबीर नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील आणि परिणामकारक होते. तसेच चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा इत्यादी बाबतींत निर्णय घेता येतात.
४. चळवळींच्या संघटना असतात. संघटनांमुळे चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येतो. उदा. शेतकर्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते.
५. चळवळ ही सामूहिक कृती असल्याने कोणत्याही चळवळींना जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो. ज्या प्रश्नाभोवती चळवळ निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटणे आवश्यक असते.
६. त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्याआधारे चळवळी जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ______ करण्यात आली.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
स्वतंत्रपूर्वकाळात ओडिशातील ______ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला.
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?