Advertisements
Advertisements
Question
धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह-पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.
Short Note
Solution
भारतातील छोटा नागपूर पठारावर खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. धनबाद हे छोटा नागपूर पठारात वसलेले आहे. लोह-पोलाद उदयोगासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल लोह-खनिज, मँगनीज तसेच कोळसा हे छोटा नागपूर पठारावर आढळतात. लोहखनिज हा वजन घटणारा कच्चा माल आहे. म्हणजेच, लोखंडावर प्रक्रिया केल्यावर मिळणारे उत्पादन म्हणजेच पोलाद हे तुलनेने कमी वजनाचे असते. म्हणून लोखंडाच्या प्रदेशातच लोह-पोलाद कारखाना स्थापन झालेला आढळतो. त्याच कारणामुळे धनबाद येथे लोह-पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.
shaalaa.com
द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - इतर घटक
Is there an error in this question or solution?