English

दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात, तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात.

रेडॉक्स अभिक्रिया = क्षपण + ऑक्सिडीकरण

Redox = Reduction + Oxidation

रेडॉक्स अभिक्रिया, एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते, तर दुसऱ्या अभिक्रिया कारकाचे क्षपण होते. ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते.

उदा., \[\ce{CuO_{(s)} + H2_{(g)} -> Cu_{(s)} + H2O_{g}}\]

या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साइड (Cuo) मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो अर्थात त्याचे क्षपण होते, तर हायड्रोजनचा अणू ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाणी (H2O) तयार होते, म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात.

रेडॉक्स अभिक्रियेची उदाहरणे :

(१) \[\ce{\underset{\text{हायड्रोजेन सल्फाइड}}{2H2S} + SO2 -> \underset{\text{सल्फर}}{3S} + 2H2O}\]

(२) \[\ce{\underset{\text{मॅगनीज डायऑक्साइड}}{MnO2} + 4HCl -> \underset{\text{मॅगनीज क्लोराड्ड}}{MnCl2} + 2H2O + Cl2↑}\]

shaalaa.com
ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [Page 45]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q २. अ. | Page 45
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×