Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
Solution
मी जांभळाचे झाड!
मी अभ्यासासाठी बागेतील एका झाडाखाली बसलो होतो. अचानक मला शुक! शुक! असा आवाज आला. म्हणून इकडे-तिकडे पाहिले तर कोणी नव्हते. म्हणून पुस्तकात पाहत बसलो. पुन्हा आवाज आला आणि पाहतो तर माझ्यासमोर उभे असलेले जांभळाचे झाड माझ्याशी बोलू लागले. ते सांगत होते की “मी तुमच्या गावाजवळच्या जंगलात जन्मलो. माझे लहानपण जंगलात गेले. जंगलात मला कसला त्रास नव्हता. माझ्या सोबतीला खूप मोठे-मोठी झाडे होती. त्यावर भरपूर पक्षी येत असून त्यांचे आवाज ऐकून मला खूप मजा वाटत होती. त्यातील काही माझ्याजवळ येत आणि माझ्याकडे बघून नंतर इकडे-तिकडे पाहून जमिनीवरील काही पडलेले खाऊन उडून जात होती. मला त्यांच्या उडण्याचे फार कौतुक वाटत होते. मलाही असे उडता यावे असे वाटे."
मी जंगलात असताना एखादा वाटसरूने मला तेथून उडण्याचे काढले. मला असंख्य वेदना झाल्या. पण कोणाला सांगणार. मी ते सर्व सहन केले. जंगलात मला ऊन, वारा, पाऊस यांचा काहीच त्रास मला नव्हता. पण आता येथे या सर्वांचा त्रास मला होतो. आता माझी उंचीही वाढली आणि फांद्याही मोठ्या झाल्या आहेत. मुले माझ्या फांद्यावर लोंबकळतात आणि फांदी मोडते. पुन्हा मला असंख्य वेदना होतात. आता मी जांभळात बहरलो आहे. म्हणजे आता लहान थोर सर्व जण मला त्रास देणार. लहानपणाचे दिवस आणि आताचे दिवस किती मोठा फरक आहे. तसेच जसजसे मी मोठे होणार तसतसे वृक्षतोडीची मला भीती वाटत आहे.
वृक्षतोड हा शब्द ऐकल्यावर मी भानावर आलो. खरचं आपण वृक्षाकडे फारच वेगळ्या नजरेने पाहतात. त्याच्या अवस्था, त्याचे उपयोग, त्याचा निःस्वार्थीपणा याचा आपण कधीच विचार करत नाही. मी स्वत: उन्हात राहुन आपल्याला सावली देतो, फळ देतो. वारा व थंडी अशा अनेक गोष्टी वृक्षांपासून आपल्याला मिळतात. वृक्षाचे असंख्य उपयोग आपण समजून घेतले पाहिजेत आणि वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. ऐवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे.