Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
Solution
मी शेतकरी बोलतोय!
मी काही कामानिमित्त एस. टी. मधून रत्नागिरीला जात होतो. एस. टी. मध्ये बरेच प्रवासी होते. मी वाचत होतो. त्यावेळी माझ्या कानावर शब्द पडले, “साहेब इथं बसू?” मी पाहिले तर एक शेतकरी माझ्याकडे दिनवाणीने माझ्या शेजारच्या जागेवर बसण्यासाठी विचारत होता. मला त्यांच्याबदल आपुलकी वाटल्याने मी त्याला होकार दिला. इकडे-तिकडे गप्पा मारता-मारता तो सांगू लागत की.
“मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. रत्नागिरीजवळ माझे गाव आहे. घरी गरिबी असल्यामुळे माझे शिक्षण जेमतेमच झाले. मला शिक्षणाची खूप आवड होती. पण परिस्थितीमुळे शेती करावी लागली. पहिल्यांदा शेतीची आवड नव्हती पण आता शेतीच बरी वाटते.”
शेतकरी म्हटले की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो अडाणी, गावंढळ आहे असा बहुतेक जणांचा समज असतो. पण आता तसे नाही. आता गावा-गावामध्ये शाळा आहेत. रेडिओ आहे. टी. व्ही. आहे. त्यामुळे अडाणी कोणी राहत नाही. रेडिओ, टी. व्ही. मुळे हवामानाचा अंदाज, बाजारपेठेची माहिती होते. त्यामुळे शेतीत आता बदल करता येतात. नवीन बी-बियाणे, तंत्रज्ञान यांचा शेतीमध्ये वापर करता येतो. देशाच्या विविध भागातील माहिती मिळते. त्यामुळे पूर्वीसारखा शेतकरी आता अडाणी राहिल नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
आपल्या येथील शेती निसर्गावर बऱ्याच प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी दुष्काळाला तोंड द्यावे लागते. कधी जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होते. ठरविलेले अंदाज आणि उत्पन्न येईल याची खात्री नसते. त्यामुळे आता बरेच तरुण शेतीऐवजी नोकरीकडे वळत आहेत. शेतीमध्ये नुकसानच होते आणि शेतकरी हा कायम कर्जबाजारीच राहतो असा सर्वांचा समज होतो. पण या गोष्टीत पूर्णपणे सत्यता नाही. व्यवस्थित नियोजन करून सर्वांवर नियंत्रण ठेवले आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी ठेवल्यास शेतीमध्ये आपण यशस्वी होतो हे नक्कीच.
असे तो सांगत असतानाच त्याचे गाव आल्यामुळे तो एस. टी. तून उतरला आणि मी त्याने सांगितलेली हकीकत कशी योग्य आहे याचा विचार करत बसलो.