Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
Solution
रविवारची सुट्टी नसती तर ........!
सर्व कारखाने, ऑफिसेस, शाळा इत्यादी बहुतेक ठिकाणी आठवड्यातून रविवारची सुट्टी असते. त्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या अंगवळणीची पडली आहे. रविवार म्हटले की सुट्टी असतेच! हे आता फिक्सच झाले आहे. पण अचानक रविवारची सुट्टी रद्द केली किंवा रविवारची सुट्टी नसती तर काय झाले असते? ही कल्पनाच करवत नाही.
याचा असा विचार केला की, सुट्टी नसती तर अनेक कामे मागे पडली असती. घरातील स्वच्छता, मुलांच्या शालेय वस्तूंची खेरेदी तसेच इतरही अनेक कामे तशीच राहिली असती. कारण आपल्याला ऑफिसमधून येण्यास संध्याकाळ होते. फक्त साधारण एक तास कसा तरी मोकळा मिळतो. त्यातून मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिक जाम यामुळे येण्यास वेळ जाणार तेव्हा मोकळा वेळ मिळणेही कठीण. मग एखाद्या दिवशी रजा घ्यावी लागणारच. अशी सारखी-सारखी रजा घेऊन कार्यालयीन कामाचा खोळंबा होणार. त्याचा परिणाम ऑफिस कामावर होणार असे दुष्टचक्र सुरू राहणार.
रविवारची सुट्टी मिळाली की भरपूर वेळ मिळतो. त्यामध्ये आपल्याला आठवड्याचा थकवा घालवण्यासाठी जरा जास्त वेळ झोप आणि आराम मिळतो. इतर गोष्टीकडे मन वळल्यामुळे दैनंदिन कामातून थोडा आराम मिळतो. थोडा उत्साह वाढतो असे अनेक फायदे रविवारच्या सुट्टीमुळे मिळतात. पण या सुट्टीचा काही लोक दुरुपयोग पण करतात. तो असा की, दिवसभर नुसते लोळत पडणे, सुट्टी म्हणून उशिरा उठणे, नाष्टा-जेवण उशिरा करणे, त्यामुळे सर्वत्र वेळेचा खोळंबा होत जातो आणि सगळा वेळ बिनकामातच जातो. तसेच काही जण रविवारला जोडूनच सुट्टी काढून वारंवार लांब फिरायला किंवा सहलीला जातात. त्यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा होतो.
रविवारच्या सुट्टीचे काही फायदे आणि काही तोटे आपण बघितले. यावरूनच सुट्टी आवश्यकच आहे का? असे म्हटले तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्या गोष्टीचे तोटेच होतात. तेव्हा या गोष्टीचा अतिरेक न करता योग्य तो उपयोग केला पाहिजे. म्हणजे जास्त वेळ झोपणे, उगाचच फिरणे या अतिरिकाच्या गोष्टी टाळल्या तर ही सुट्टी खूप फायदेशीर ठरते. मनाला विरंगुळा (आनंद) मिळतो. कामात बदल होतो, उत्साह वाढतो व विश्रांतीही मिळते. तेव्हा सुट्टीचा सदुपयोग करून घ्यावा.