Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
भारतातील महिलांची स्थिती
(अ) आर्थिक असमानता
(ब) तस्करी व शोषण
(क) साक्षरतेचे प्रमाण
(ड) राजकीय प्रतिनिधित्व
Solution
भारतातील महिलांच्या स्थितीचे विवरण पुढीलप्रमाणे:
(अ) आर्थिक असमानता: भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री-पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी २८.२% इतकी कमी आहे. तर तुलनेने पुरुष ७८.८% आहेत.
(ब) तस्करी आणि शोषण: २०१३ साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यात पुढे असे नमूद केले आहे की, 'त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते.
(क) साक्षरतेचे प्रमाण: भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. २०११ च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण ८२.१४% आहे, तर महिलांमधील प्रमाण ६५.४६% आहे.
(ड) राजकीय प्रतिनिधित्व: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यांतील विधानमंडळांमध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेली आहे.