Advertisements
Advertisements
Question
'डोळयांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Solution
'दवांत आलीस भल्या पहाटे' या कवितेत कवी बा. सी. मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दवभारल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती, यांतील संभ्रम मनोहारी प्रतिमा तून प्रकट केला आहे.
शुक्राच्या त्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली. पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यांत प्रेमाची आश्वासक चमक का नाही? हे सांगताना कवीने डोळ्यांमधल्या डाळिंबाचे पारा' ही तरळ प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो. डाळिंबांच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो. तसे तिच्या डोळ्यात प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजिली आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
हिरवे धागे म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -
प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.
- प्रेयसीचे नाव काय?
- ती वळून पाहणे का विसरली असावी?
- भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
- ती कुठे राहते?
- तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
- तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
- तिचे डोळे कोणता इशारा देतात?
- तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
एका वाक्यात उत्तर लिहा.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
एका वाक्यात उत्तरे लिहा :
'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
खालील चौकटी पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह | कवितेतील छंद |
'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा.' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
'दवांत आलिस भल्या पहाटीं' कवितेत तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.