Advertisements
Advertisements
Question
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- गहाण -
- डोईवर -
- झेतभट्टी -
- धुंद -
४. काव्या सौंदर्य: (2)
“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”
Solution
१.
- दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - दु:खात
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - बरबाद
२.
३.
- गहाण - तारण ठेवलेली वस्तू
- डोईवर - डोकेवर
- झोतभट्टी - अग्नीच्या मोठी ज्वालाची भट्टी
- धुंद - उन्मत
४. वरील ओळ नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘दोन दिवस’ या कवितेतील आहे.
या कवितेत कष्टकरी, कामगारांच्या जीवनात कायम वास्तव्यास असलेल्या दु:खाचे वर्णन कवीने केले आहे.
कवी म्हणतात, मी कष्ट करताना कधी स्वतःचा विचार केला नाही; कायम जगाचाच विचार करत कष्ट करत राहिला. या दुःखातही मी सुखाची वाट पाहण्यात आयुष्य खर्च केले. हे करत असताना मी धीर सोडला नाही. अनुभवातून मी खूप काही शिकलो. आयुष्यात कसे ठामपणे उभे राहायचे हे मला समजले.
‘दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे’ या ओळीतून कवीला असे सांगायचे आहे की, कितीही संकटे आली तरी खचून न जाता धीराने सामोरे जाऊन खंबीरपणे जीवन जगावे. जीवनात सुख-दु:ख हे येतच असते. पण आपण न डगमगता येईल त्या परिस्थितीत आनंदाने जगावे असे सांगितले आहे.