Advertisements
Advertisements
Question
एक इष्टिकाचिती आकाराचे घरगुती मत्स्यालय बनवण्यासाठी 2 मिमी जाडीची काच वापरली. मत्स्यालयाची (च्या भिंतींची) बाहेरून लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे सेंटिमीटरमध्ये 60.4 × 40.4 × 40.2 आहे, तर त्या मत्स्यालयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल?
Solution
काचेची जाडी = 2 मिमी = `2/10` = 0.2 सेमी
लांबी, l = 60.4 − 0.2 − 0.2 = 60.4 − 0.4 = 60 सेमी
रुंदी, b = 40.4 − 0.2 − 0.2 = 40.4 − 0.4 = 40 सेमी
उंची, h = 40.2 − 0.2 = 40 सेमी
मत्स्यालयात जास्तीत जास्त मावणारे पाणी = मत्स्यालयाचे घनफळ
= l × b × h
= 60 × 40 × 40
= 96000 घसेमी
∴ मत्स्यालयात जास्तीत जास्त 96,000 घसेमी पाणी मावेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा.
एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा.