Advertisements
Advertisements
Question
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
Distinguish Between
Solution
विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड | समशीतोष्ण वनातील लाकूडतोड | |
(१) | विषुववृत्तीय वने ही घनदाट वने आहेत. | समशीतोष्ण वनातील झाडांची संख्या ही तुलनेने कमी असते आणि ही वने विरळ आहेत. |
(२) | या वनातील झाडांची उंची खूप जास्त असते. | या वनातील झाडे सरळ आणि उंच वाढतात. |
(३) | या वनातील झाडांचे लाकूड अतिशय टणक असते. | या वनातील झाडांचे लाकूड हे मऊ असते. |
(४) | या वनांमध्ये विविध प्रकारची झाडे एकत्रितरीत्या वाढतात. | या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती आणि कागदाचा लगदा निर्मिती उदयोगात होतो. |
(५) | त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त झाडाची नेमकी निवड करण्यास सुलभ जाते. | त्यामुळे या वनांमधील लाकडाला खूप मागणी आहे. |
(६) | दाट वने, दलदलीचा प्रदेश यांमुळे येथे वाहतुकीच्या सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. | वनातील झाडांची घनता कमी असल्यामुळे येथील वाहतूक सुगमता जास्त आहे. |
(७) | तसेच हवामानही खूप रोगट आहे. | या प्रदेशात हवामान आल्हाददायक असते. |
(८) | विषुववृत्तीय वनात लाकूडतोड व्यवसाय अविकसित आहे. | त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधीय वनात व्यापारी तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून लाकूडतोड केली जाते. |
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - लाकूडतोड
Is there an error in this question or solution?