Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय.
Distinguish Between
Solution
चतुर्थक व्यवसाय | पंचक व्यवसाय | |
(१) | चतुर्थक व्यवसायातही कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही. | प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायांचे उच्च पातळीवरून होणारे व्यवस्थापन करणाऱ्या उच्च दर्जा क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या व्यवसायांना पंचक व्यवसाय म्हणतात. |
(२) | हे व्यवसाय पूर्णतः वैयक्तिक ज्ञान, कौशल्यांवर आधारित आहेत. | या व्यवसायात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्व व्यवसायांचा प्रचंड आवाका माहीत असणे आवश्यक आहे. |
(३) | हे व्यवसाय प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य करतात. | या क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न, श्रेणी, सुधार, वाढ करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे कौशल्य आणि नियोजनाच्या अंमलबजावणीचे स्वरूप ठरवण्याचे कौशल्य या व्यवसायातील लोकांना असते. |
(४) | शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सेवा-सुविधा, वित्तविषयक मार्गदर्शन, न्यायविषयक मार्गदर्शन, कर रचनेविषयक मार्गदर्शन या क्षेत्रांत चतुर्थक व्यावसायिक कार्य करतात. | व्यवस्थापन, कौशल्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उच्च दर्जाचे संशोधक, न्यायाधीश हे सर्व पंचक व्यवसाय आहेत. |
shaalaa.com
संदेशवहन
Is there an error in this question or solution?