Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
डिमटेरियलायझेशन व सिमिटेरियलायझेशन
Distinguish Between
Solution
मुद्दे | डिमटेरियलायझेशन | रिमटेरियलायझेशन |
अर्थ | प्रतिभूतीचे भौतिक प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्याची ही प्रक्रिया. | प्रतिभूतीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतरित करण्याची ही प्रक्रिया. |
रूपांतर | यामध्ये प्रतिभूतीचे कागदी प्रमाणपत्र स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक/डिजिटल स्वरूपात रूपांतर केले जाते. | यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक/कागदी स्वरूपात रूपांतर केले जाते. |
विहित अर्जाचा वापर | यामध्ये (डीआरएफ) डिमॅट विनंती अर्ज गुंतवणूकदार डीपीला डिमटेरियलायझेशन साठी देतो. | यामध्ये (आरआरएफ) रिमॅट विनंती अर्ज गुंतवणूकदार डीपीला रिमटेरियलायझेशन साठी देतो. |
क्रम | ही एक प्रारंभिक प्रक्रिया आहे. डिपॉझिटरी पद्धतीचे हे प्राथमिक आणि मुख्य कार्य आहे. | ही एक उलट प्रक्रिया आहे. हे डिपॉझिटरीचे दुय्यम व सहाय्यक कार्य आहे. आधीच डिमॅट केलेल्या प्रतिभूती कागदी स्वरूपात केल्या जातात. |
प्रतिभूतीची ओळख | डिमॅट भागांना स्वतंत्र ओळख क्रमांक नसतात. म्हणजेच डिमॅट भाग फंगीबल असतात. | रिमटेरियलाईज केलेले भाग हे भाग प्रमाणपत्राच्या रूपात असतात आणि त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक असतात. |
सुरक्षितता | डिजीटल स्वरूपामुळे अनेक धोके कमी झाले आहेत. यामध्ये प्रमाणपत्र गहाळ होणे, फसवणूक इत्यादी अनेक धोक्याचा सामना करावा लागतो. | यामध्ये प्रमाणपत्र गहाळ होणे, फसवणूक इत्यादी अनेक धोक्याचा सामना करावा लागतो. |
प्रक्रियेतील कठीणता | डिमॅट ही सोपी प्रणाली आहे. तसेच वेळ खाऊ पद्धत नाही. | रिमॅट ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. |
shaalaa.com
भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना/संज्ञा
Is there an error in this question or solution?