Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा:
मत्स्यप्राणी वर्ग आणि सरीसृपप्राणी वर्ग.
Distinguish Between
Solution
गुणधर्म | मत्स्यप्राणी वर्ग | सरीसृपप्राणी वर्ग |
आधिवास | हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. | प्राणी -उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. |
शरीररचना | पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. | शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. |
श्वसन | श्वसन कल्ल्याद्वारे होते. | फुफ्फुसांद्वारे श्वसन होते. |
हृदय संरचना | दोन कप्प्यांचे हृदय असते (काही प्रजातींमध्ये तीन कप्पे असतात). | प्रामुख्याने तीन कप्प्यांचे हृदय असते (मात्र मगरींना चार कप्प्यांचे हृदय असते). |
प्रजनन | प्रामुख्याने अंडज असतात व बाह्य फलन होते. | बहुतेक प्राणी अंडज असतात, पण काही प्राणी अजीवज (जिवंत पिल्ले जन्माला घालणारे) असतात; अंतर्गत फलन होते. |
उदाहरणे | रोहु, शार्क, स्टिंग-रे, समुद्र घोडा. | कासव, सरडा, साप. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?