Advertisements
Advertisements
Question
‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.
Solution
सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ या कथेत स्वातंत्र स्वातंत्रप्राप्तीनंतर विकासाच्या वाटेवरील गावगाड्या समोरील प्रश्न, ते सोडविताना येणाऱ्या अडचणी व ग्राम-सुधारणेसाठी निष्ठापूर्वक काम करणारे समाजसेवक बापू गुरुजी. त्यांचे कार्य आणि कथेत योजलेली प्रतीके याचा धागा कथालेखिकेने संवेदनशील भावभावनांतून जोडण्याचे कार्य केले आहे. ‘गढी’ या प्रतीकातूनही गावातील चांगले वाईट स्थित्यंतरे आणि गुरुजींचे कार्य याचा सहसंबंध आपणास पाहावयास मिळतो.
गढी - सातपुड्याच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. शेजारून वाहणारी वाननदी आणि या गावातच गावाच्या पाटलाची ‘गढी’ उभी आहे ही ‘गढी’ म्हणजे त्या गावाचे पूर्व वैभव पांढऱ्या शुभ्र मातीत बांधलेली, ऊनवाऱ्यात आपले वैभव जपत उभी असलेली मात्र अलीकडे दिवसेंदिवस खचत चाललेली ‘बापू गुरुजी’च्या उमेदीसारखी. पाटलाचा वाडा पडला तशी तीही उघडी पडली मात्र अजूनही ती ऊनपावसात तग धरून उभी आहे. गुरुजींही गावाचा विकास करत होते. मात्र गावातील उचापती करणारे लोक गुरुजींच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागले त्यामुळे गुरुजींना वाईट वाटत असे परंतु विरोधकांसमोर, उचापती करणाऱ्या लोकांसमोर ते तग धरू शकत नव्हते. तर ते फक्त मनातल्या मनात दुःख व्यक्त करत होते. तसेच ‘गढी’ ने ही आता ऊनपावसासमोर हात टेकले होते. काठाकाठाने ती आता खचत चालली होती. त्या गढीची पांढरी मगी मिटत असल्या कारणाने गढी दिवसेंदिवस खचावी असेच गाववाल्यांना मनोमन वाटत असे आणि गुरुजींही विकास कामापासून दूर झाले तर तेच काम करण्याची संधी गावातील विरोधकांना मिळणार होती. गढी दर पावसाळ्यात खचत होती आणि उन्हाळ्यात गावातील माणसे गढीची माती विल्याने खणून नेत होते. आता मात्र ती पुरती खचल्याने तिच्या जागी मोठं पांढरं मैदान तयार झाले होते. एकेकाळी तिचे उभे असलेले वैभव आज असे पायदळी पडले होते. तेच गुरुजींच्या विकासात्मक कार्याचे झाले. त्यांना गावासाठी नवनव्या योजना आणून विकास करायचा होता. मात्र गावात उचापती करणाऱ्या, गुरुजींच्या कार्यास विरोध करणाऱ्यांना तो विकास नको होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून गुरुजींही माघार घेत होते आणि निवृत्तीच्या काळात तर ते स्वत: हून बाजूला सरू लागले. अशाप्रकारे ‘गढी’ या प्रतीकातून गुरुजींच्या कार्याशी सहसंबंध जोडला आहे.