English

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा.

Explain

Solution

सिद्धांताचे विधान: प्रा. आल्‍फ्रेड मार्शल यांच्या मते, “इतर परिस्‍थिती स्थिर असताना, व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्‍या एखाद्या वस्‍तूच्या साठ्यात वाढ होत गेल्‍यास त्‍यापासून मिळणारे अतिरिक्‍त समाधान कमी होत जाते.”

दुसऱ्या शब्‍दांत, इतर परिस्‍थिती कायम असताना एखाद्या वस्‍तूच्या साठ्यात वाढ होत गेल्‍यास वस्‍तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्‍येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्‍यात, एखादी वस्‍तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्‍तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते.

घटत्‍या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके खालीलप्रमाणेआहेत:

  1. विवेकशीलता: उपभोक्‍ता विवेकशील आहे आणि त्‍याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. त्‍यामुळे तो महत्‍तम समाधान मिळविण्याचा प्रयत्‍न करतो.
  2. संख्यात्‍मक मापन: सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्‍मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते. त्‍यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्‍य होतात. यामुळे वस्‍तूच्या प्रत्‍येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्‍यांची तुलना करता येते.
  3. एकजिनसीपणा: उपभोगातील वस्‍तूचे सर्व नग आकार, स्‍वरूप, रंग, चव इत्‍यादींबाबत समान आहेत.
  4. उपभोग सातत्‍य: एखाद्या वस्‍तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो.
  5. योग्‍य आकारमान: उपभोग्‍य वस्‍तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्‍य किंवा साधारण असावे. ते अत्‍यंत मोठे किंवा लहान नसावे.
  6. स्‍थिरता: उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्‍त्‍याचे उत्‍पन्न, चव-पसंती, सवयी, आवडी-निवडी यांसारखे घटक स्‍थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगिता सुध्दा स्‍थिर असल्‍याचे गृहीत धरले जाते.
  7. विभाज्‍यता: सिद्धांत असे गृहीत धरतो की, उपभोगात आणलेली वस्‍तू विभाज्‍य असावी. त्‍यामुळे वस्‍तूचे लहान भागात विभाजन करता येईल.
  8. एकच गरज: एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्‍तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहित धरतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×