Advertisements
Advertisements
Question
वरील परिच्छेद वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबाबाहेर येताना त्याचे पुन्हा अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिकघटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पाहावयास मिळतो. |
- इंद्रधनुष्य निर्मितीत कोणत्या तीन प्रमुख घटना कारणीभूत असतात?
- अपवर्तन कसे होते?
- इंद्रधनुष्य निर्मितीची आकृती काढा.
Comprehension
Solution
- इंद्रधनुष्याच्या निर्मितीसाठी प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि अंतर्गत परावर्तन या तीन मुख्य घटना जबाबदार असतात.
- जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या अपवर्तनांक असलेल्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो आणि त्याच्या वेगातील बदलामुळे दिशेत बदल होतो, तेव्हा अपवर्तन घडते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?