Advertisements
Advertisements
Question
इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा.
Solution
१. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
२. यानुसार, इतिहासाची मांडणी पुढील टप्प्यांना अनुसरून केली जाते.
अ. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे.
ब. उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे.
क. ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे.
ड. विशिष्ट ऐतिहासिक घटनांविषयक उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ आकलन करणे. शिवाय, ऐतिहासिक अभ्यासपद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचेही आकलन करून घेणे.
इ. ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य अशा प्रश्नांची मांडणी करणे.
फ. या प्रश्नांना अनुसरून संभाव्य परिकल्पना मांडणे.