Advertisements
Advertisements
Question
जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.
Answer in Brief
Solution
- संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
- ही क्षेत्रे एके काळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती.
- आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत.
- सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत.
- यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत.
- पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत.
- भारतातील 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात.
- पश्चिम घाटात 1500 हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात.
- जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत.
shaalaa.com
जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे (Hotspots of the biodiversity)
Is there an error in this question or solution?