Advertisements
Advertisements
Question
ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
Answer in Brief
Solution
ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे:
- उद्रेकानुसार वर्गीकरण: उद्रेकानुसार ज्वालामुखीचे पुढील दोन प्रकार पडतात:
- केंद्रीय ज्वालामुखी:
- ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो आणि या नलिकेसारख्या भागातून लाव्हारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.
- बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात.
- उदा., जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.
- भेगीय ज्वालामुखी:
- ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात.
- ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात.
- त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
- उदा., भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.
- केंद्रीय ज्वालामुखी:
- उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण: उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील तीन प्रकार पडतात:
- जागृत ज्वालामुखी: वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
- सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी: काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा., इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.
- मृत ज्वालामुखी: ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा., टांझानियातील किलीमांजारो.
shaalaa.com
ज्वालामुखीचे प्रकार
Is there an error in this question or solution?