English

ज्या त्रिकोणाची परिमिती 14.4 सेमी आहे आणि ज्याच्या बाजूंचे गुणोत्तर 2 : 3 : 4 आहे, असा त्रिकोण काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

ज्या त्रिकोणाची परिमिती 14.4 सेमी आहे आणि ज्याच्या बाजूंचे गुणोत्तर 2 : 3 : 4 आहे, असा त्रिकोण काढा.

Sum

Solution 1

स्पष्टीकरण:

माना ΔABC हा अपेक्षित त्रिकोण आहे.

रेखा XY = 14.4 सेमी काढा, जे ΔABC ची परिमिती आहे.

आपल्याला रेखा XY ला 2:3:4 च्या अनुपातात विभाजित करायचे आहे.

किरण XP असा काढा की, ∠YXP = 30°

किरण XP च्या विपरीत बाजूला रेखा YQ असे काढा की, ∠XYQ = 30°

किरण XP चे 9 समान भाग करा, म्हणजेच `"X"_(x_1)`, x1x2, ... ,x8x9 तयार करा.

त्याच प्रकारे, आकृतीप्रमाणे, किरण YQ चे 9 समान भाग करा.

x2y7 आणि x5y4 जोडा, जे रेखा XY ला अनुक्रमे B आणि C बिंदूंत छेदतात.

B केंद्र व BX एवढी त्रिज्या घेऊन किरण XP च्या वरच्या बाजूस कंस काढा.

C केंद्र व CY एवढी त्रिज्या घेऊन किरण XP च्या वरच्या. बाजूस आधी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा.

रेखा AB आणि रेखा AC काढा.

ΔABC हा अपेक्षित त्रिकोण आहे.

shaalaa.com

Solution 2

कच्ची आकृती:

स्पष्टीकरण:

समजा, सामाईक गुणक x आहे.

∴ ∆ABC मध्ये,

AB = 2x सेमी, AC = 3x सेमी, BC = 4x सेमी

त्रिकोणाची परिमिती = 14.4 सेमी

∴ AB + BC + AC = 14.4

∴ 9x = 14.4

∴ `x = 14.4/9`

∴ x = 1.6

∴ AB = 2x = 2 × 1.6 = 3.2 सेमी

∴ AC = 3x = 3 × 1.6 = 4.8 सेमी

∴ BC = 4x = 4 × 1.6 = 6.4 सेमी

shaalaa.com
त्रिकोण रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: त्रिकोण रचना - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [Page 56]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 त्रिकोण रचना
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q 3. | Page 56
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×