Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ______
Solution
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे नुकसान टळेल व ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टळेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे लिहा.
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.
कारणे लिहा.
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण ______.
उत्तरे लिहा.
स्नेहलने केलेला निश्चय-
'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
१. आकृती पूर्ण करा. (०२)
“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?” “सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळाव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळावा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! 'एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा', रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं ... पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या... माती धूळा बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. “मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो”, सुमितनं सांगितलं. “सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळयांत भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरला की काय तुम्ही लोक?” बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. “मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्ट्स”, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. |
२.
अ) आकृती पूर्ण करा. (०१)
आ) एका वाक्यात उत्तर लिहा. (०१)
सुमितने तयार केलेले ॲप कोणते?
३. स्वमत (०३)
तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कोण ते लिहा. (०२)
अ) रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा – ______
ब) झर्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणार्या – ______
क) स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे – ______
ड) पायाची स्वच्छता बघणारा – ______
“गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्ट्स...!” असं म्हणत त्यानं मोबाइलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्ट्स! दि मोस्ट क्लीन फूटप्रिन्ट्स!!' “वाऽ पाह्यलंत रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्पटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “ह्याऽ हे भलतचं!” रेखामावशींच्या पाायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिर्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?” “त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत....!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया,” त्यांनी पुस्ती जोडली. |
२. आकृती पूर्ण करा (०२)
अ)
आ)
३. स्वमत (०३)
जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटते ते तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. पावडेकाका व रेखा मावशी यांच्या पावलांमधील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. (०२)
व्यक्ती | पावलांचा रंग | पावलांच्या रंगाचे कारण |
रेखा मावशी | ||
पावडेकाका |
“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत”, सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!” “खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळ मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले. |
२. आकृती पूर्ण करा. (०२)
३. स्वमत (०३)
तुमची शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना कराल ते तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) चौकटी पूर्ण करा. (2)
- मावशींचे राहण्याचे ठिकाण - ______
- मावशींना लेकाने दिलेली भेट - ______
- झोपडीपुढे लावलेले झाड - ______
- निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली - ______
‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’ ‘‘त्या टेकडीपल्याड’’, मावशी म्हणाल्या. ‘‘इथून किती कि. मी. आहे?’’ ‘‘तीन.’’ ‘‘तुम्ही कशा आलात इथपर्यंत?’’ ‘‘गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते’’, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. ‘‘आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली ... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले ... ‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस!!’” ‘‘वाऽ पाह्यलंत रेखामावशींचे पाय चंदेरी आहेत.’’ |
(2) कोण ते लिहा. (2)
- रेखामावशींची माहिती घेणारा - ______
- चंदेरी पाय असलेल्या - ______
(3) स्वमत. (3)
‘ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम’ तुमच्या शब्दांत लिहा.