Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.
Answer in Brief
Solution
- ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्ये असलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा, लांब समुद्र आहे. या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूवेष्टित आहे.
- त्यामुळेच हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेच येथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते.
- उत्तरेकडील भाग मात्र सहारा वाळवंटांच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन होते आणि त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाची घनता
Is there an error in this question or solution?