Advertisements
Advertisements
Question
खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.
- पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
- सायकलवरून प्रवास करा.
- बसने, रेल्वेने प्रवास करा.
- सौरऊर्जेचा वापर करा.
Solution
- पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
इंधनबचतीचे मार्ग:
पाणी तापले की, वाफ वर येते. ही वाफ वाया जाऊ नये, म्हणून पातेल्यावर झाकण ठेवावे. म्हणजे वाफेनेही पाणी लवकर तापते व इंधनाची बचत होते. - सायकलवरून प्रवास करा.
इंधनबचतीचे मार्ग:
स्कूटरला पेट्रोल हे इंधन लागते. सायकल हवेवर चालते. तिला इंधन लागत नाही. म्हणून सायकलने प्रवास केल्यास इंधनाची बचत होते. - बसने, रेल्वेने प्रवास करा.
इंधनबचतीचे मार्ग:
वैयक्तिक वाहनाने प्रवास केला, तर ठराविक इंधन लागतेच. परंतु बस अथवा रेल्वेमधून अनेक माणसे एकावेळी प्रवास करू शकतात. त्यामुळे इंधनाची बचत होते. - सौरऊर्जेचा वापर करा.
इंधनबचतीचे मार्ग:
अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅस अथवा घासलेट हे इंधन लागते. परंतु सूर्याची उष्णता मुबलक मिळते. त्यास आकार (पैसे) लागत नाही. म्हणून सौरऊर्जेचा वापर केल्यास इंधन वाचते.
RELATED QUESTIONS
हा संवाद कोठे झाला?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.
लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.
संजू ______ उठतो.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पत्र कोणी पाठवले?
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चमक