Advertisements
Advertisements
Question
खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
कृती
- दाेन वेगवेगळ्या लांबीची ॲल्युमिनियमची पन्हाळी घ्या.
- दोन्ही पन्हाळ्याची वरील टोके समान उंचीवर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा.
- आता दोन समान आकारांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पन्हाळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा. ते घरंगळत जाऊन सारखीच अंतरे पार करतील.
प्रश्न
- चेंडू सोडण्याच्या स्थिती वेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते?
- चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतरण होते?
- चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात?
- चेंडूमध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही कोणती असते?
- वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो? स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये स्थितिज ऊर्जा असते.
- चेंडू खाली घरंगळत येत असताना स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतरण होते.
- चेंडू घरंगळत जाताना सारखेच अंतर पार करते याचे कारण असे की दोन्ही चेंडू समान आकराचे, समान वजनाचे आणि समान उंचीवरुन सोडण्यात आले असल्यामुळे दोन्ही चेंडूमध्ये असलेली स्थितिज उर्जा समान असते. कारण स्थितिज ऊर्जा ही फक्त वस्तुमान आणि उंचीवर अवलंबून असते, वाहण्याच्या मार्गावर अवलंबून नसते.
- चेंडूमध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांची बेरीज होय. एकूण ऊर्जा ही नेहमी स्थिर (अक्षय्य) असते. म्हणजेच, एकूण ऊर्जा = गतिज ऊर्जा + स्थितिज ऊर्जा
- A. या कृतीतून ऊर्जेसंबंधी, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगता येतो. विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते हे या कृतीवरून स्पष्टपणे सांगितले आहे.
B. सुरुवातीला जेव्हा चेंडू विराम अवस्थेत असतो, तेव्हा त्यामध्ये स्थितिज ऊर्जा साठवलेली असते, जेव्हा तो चेंडू सोडतो, तेव्हा स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते आणि एकूण ऊर्जा अक्षय्य राहते.
shaalaa.com
ऊर्जा
Is there an error in this question or solution?