Advertisements
Advertisements
Question
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
Solution
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला - व्यवहारी
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
कोण ते लिहा.
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______
कोण ते लिहा.
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा. (२)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
(बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. |
२) एका शब्दात माहिती लिहा. (१)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस-
- स्टेशन व रेल्वेगाडी-
ii) कारण लिहा. (१)
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...
३) स्वमत- (३)
तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) वर्णन करा. (२)
डेथ झोन
'डेथ झोन' ची चढाई सुरू झाली... जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला... पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. 'तुला मरायचं नाहीये, अरुणिमा', अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. 'अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर... एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरलापाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला... मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला... अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. |
२) अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अनुभव लिहा. (२)
अ) __________________
आ) __________________
इ) __________________
ई) __________________
३) स्वमत- (३)
'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा. (२)
अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,-
आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले-
आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या 'डेथ झोन' मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते! गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हां कुमारवयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.. |
२) आकृती पूर्ण करा. (२)
गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे | |||
३) स्वमत- (३)
'आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला.' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. नावे लिहा. (2)
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
- अरुणिमाचे गाव - ______
दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. |
2. कारणे लिहा. (2)
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______
3. स्वमत (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा. (2)
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
- अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमत. (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.