English

खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी आजीचे दिसणे. आजीचे राहणीमान. आजीची शिस्त. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.

Answer in Brief
Chart

Solution

आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
आजीचे राहणीमान : त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.
आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

shaalaa.com
आजी : कुटुंबाचं आगळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ - कृती [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ
कृती | Q (२) | Page 7

RELATED QUESTIONS

पाठात आलेल्या खेळाचे वर्गीकरण करा.


पाठात आलेल्या खेळाचे वर्गीकरण करा.


‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुलना करा/साम्य लिहा.
आगळ - वाड्याचे कवच, आजी - कुटुंबाचे संरक्षक कवच


पाठात (आजी : कुटुंबाचं आगळ) चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.


पाठाच्या (आजी: कुटुंबाचं आगळ) शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) का ते लिहा.  (2)

  1. आजी मुलांना गोठ्यातच दूध प्यायला लावायची....
  2. आजी सोप्यात बसून सक्त पहारा द्यायची....
        आमच्या घरी एक गावरान गाय होती. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न् ग्लास घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यात दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची.

२) काय ते सांगा.  (2)

आजीचा कटाक्ष असावयाच्या त्या गोष्टी-

  1. ____________
  2. ____________

३) स्वमत-  (3)

तुमच्या घरामध्ये कामांची विभागणी कोण करते आणि कशी? ते सविस्तर लिहा.


१) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

i) चूक की बरोबर ते लिहा. (१)

  1. भाकरी करपल्या, की सरपण फोडणाऱ्याला आजी शिव्या द्यायची - 
  2. मुलांच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या -

ii) आकृतिबंध पूर्ण करा.  (१)

कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या, की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न् आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसता बसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या, सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा.

२) घटनांप्रमाणे ओघतक्ता पूर्ण करून लिहा.  (२)

स्वयंपाक झाला, की आधी बालगोपाळांची पंगत बसायची
______________________________
आजी धपाटे घालून खाऊ घालायची
________________________________
शेवटी सगळ्या बायका मिळून जेवत

३) स्वमत-  (३)

पाठाच्या आधारे एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल तुमचे विचार स्पष्ट करून लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कसे ते लिहा.  (१)

अ) ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची पद्धत -

  1. ____________
  2. ____________

ब) एका शब्दात उत्तर लिहा. (१)

  1. लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र- ______
  2. लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षककवच - ______
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे,

२. काय ते सांगा.  (२)

उताऱ्यात आलेले बैठे खेळ-

  1. ____________
  2. ____________
  3. ____________
  4. ____________

३. स्वमत-  (३)

आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. लेखकाच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

       सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची न् गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राह्यची. झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव-शेव म्हणून खायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापानी खेळायचं, चटके बसायला लागले, की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पाढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्ग दत्त वातावरणात बालपण आकारत होतं.
       गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू-ज्वारौचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्ण्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची- पात्रंची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या-मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो. भांडत होतो. पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजंत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो.

२) एका शब्दात उत्तर लिहा.  (२)

  1. लेखकाची लहानपणी अभ्यास करण्याची जागा - ______
  2. लेखकाला लहानपणी मिळालेली मायेची सावली - ______

३) स्वमत-  (३)

तुम्हांला आठवत असलेल्या कोणत्याही एका अविस्मरणीय प्रसंगाचे वर्णन करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. कोण ते लिहा. (2)

  1. भरपूर दूध देणारी - ______
  2. जवळपास साडेपाच फूट उंचीची - ______

           माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोडणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.

           आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची.

2. खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा. (2)

  1. लेखकाची आजी धार काढायला निघायची. 
  2. लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती. 

3. स्वमत (3)

लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×