Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्टये लिहा.
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता ............. अहवाल लेखनाची विश्वसनीयता .............. लेखनातील सोपेपणा शब्दमर्यादा ............. नि :पक्षपातीपणा.
Very Long Answer
Solution
- वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता: अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णत: सुस्पष्ट असतात.
- विश्वसनीयता: अहवालातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. हे त्या अहवालांचे खास वैशिष्ट्य असू शकते.
- सोपेपणा: शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी असते. गरज नसेल तर त्यात बोजड शब्द, फारसे तांत्रिक शब्द वापरले जात नाहीत. विनाकारण आलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती इत्यादी गोष्टी अहवालात टाळल्या जातात; परंतु अहवालात त्या त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात.
- शब्दमर्यादा: अहवालाच्या विषयावर/स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे, वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. त्यांचे स्वरूप निश्चित असते.
एखाद्या समस्येच्या/उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगव्यवसाय, सार्वजनिक सेवा (शहरातील बस वाहतूक) यांच्यासंदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. त्यात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. - नि:पक्षपातीपणा: अहवालाचा विषय कोणताही असो, प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामाईक वैशिष्ट्य म्हणजे त्या अहवालाचा नि:पक्षपातीपणा. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाध आणणारी स्वत:ची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. स्वत:च्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. त्या त्या समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय काय अनुभवले, पाहिले, ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?